शिळफाट्यावर नो इंट्रीतून वाहतुक

। खोपोली । प्रतिनिधी ।
शिळफाट्यावरील वाहतूककोंडीने सारेच त्रस्त असताना शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील रस्त्यावरून नो इंट्रीतून बेदरकारपणे वाहने चालवणार्‍या वाहनचालकांमुळे मोठ्या अपघाताची भीती वर्तवली जात असून पोलिसांनी कठोर पवित्रा घेत वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक अथवा कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. मुंबई-पुणे,जुना राष्ट्रीय महामार्ग खोपोलीतून गेला आहे. या मार्गावर शिळफाटा येथे होणार्‍या रोजच्या वाहतूककोंडीने सारेच त्रस्त आहेत. वाहतूककोंडीचा प्रश्‍न कायम असतानाच नियम मोडत नो इंट्रीतून बेदरकारपणे वाहने चालवणार्‍यांची संख्या वाढली आहे. शिळफाट्यावरील वाहतूककोंडीने सारेच त्रस्त असताना नो इंट्रीतून बेदरकारपणे वाहने चालवणार्‍या वाहनचालकांमुळे मोठ्या अपघाताची भीती वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, इंदिरा चौकाप्रमाणेच वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ वाहतूक पोलिसांना तैनात करून कठोर पवित्रा घेत वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली जात असताना अपघात टाळायचे असतील तर पोलिसांनी मोठी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

Exit mobile version