अवजड वाहन चालवणार्‍यांना सफर सुरक्षा प्रशिक्षण

| पनवेल | वार्ताहर |
अवजड वाहन चालवणार्‍या चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने तळोजा वाहतूक शाखेच्यावतीने ‘सफर सुरक्षा’ या सीएसआर उपक्रमांतर्गत प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले.

या शिबिरात तळोजा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कदम व पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार जगताप यांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमातून अवजड वाहनचालक, रिक्षा चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. यावेळी वाहन चालवताना वाहनचालकांनी कोणती काळजी घ्यावी, योग्य नियमांचा वापर करावा, वाहन चालवताना रोडवरील वाहतूक चिन्हांवर लक्ष द्यावे, सिग्नलचा वापर करावा, वेगमर्यादा पाळावी व मद्यपान करून गाडी चालवू नये, अपघात झाल्यास प्रथमोपचाराचे वापर करावे, याबाबत वाहनचालकांना प्रशिक्षण दिले.

Exit mobile version