रात्रीचा प्रवास करताय? सतर्क रहा; या मार्गावरील वाहतूक विस्कळीत

अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग- रेवदंडा मार्गावर सोमवारी (दि.१) रात्री दहाच्या सुमारास कुरुळ गावाच्या हद्दीत विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्याने या मार्गावरील वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली होती. तर अलिबाग-मांडवा मार्गावर चोंढी येथे शाईन हॅाटेलसमोर झाड पडल्याची घटना रात्री साडेनऊच्या सुमारास घडली.

हवामान विभागाच्या माहितीनुसार, रायगडात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रात्रीच्यावेळी प्रवास करताना नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Exit mobile version