आयुर्वेदिक चिकित्सा शिबिरात २४० रुग्णांवर उपचार

| नेरळ | प्रतिनिधी |
तालुक्यातील कोषाने येथे मुंबईत येथील ज्योवीस आयुर्वेद हॉस्पिटल यांच्याकडून आयुर्वेदिक चिकित्सा शिबिराचे आयोजन होते. या शिबिरात तब्बल 240 रुग्णांवर उपचार करण्यात आले. कर्जतचे माजी आ. तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान आणि गोविंद दुग्धालय यांच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई दादर येथील ज्योवीस आयुर्वेद यांच्याकडून या शिबिराचे आयोजन माजी सुर्वे प्रतिष्ठानकडून केले जाते. कर्जत नेरळ राज्यमार्ग रस्त्यावर कोषाने येथील गोविंद दुग्धालयात आयोजित शिबिराचे उद्घाटन प्रगत शेतकरी हरिश्‍चंद्र ठोंबरे यांच्या हस्ते झाले.

त्यावेळी ज्योवीस आयुर्वेद हॉस्पिटलचे डॉ. राज सातपुते, डॉ. ज्योती सातपुते यांच्यासह माजी आ. तुकाराम सुर्वे प्रतिष्ठानचे मुकेश सुर्वे, विजय मांडे, मनीषा सुर्वे यांच्यासह कर्जत शहर राष्ट्रवादी काँग्रेस रणजित जैन, नेरळ शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बंडू क्षीरसागर, नेरळ शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष सारंग,रायगड भूषण किशोर गायकवाड आदी उपस्थित होते.या शिबिरात शरीरातील सर्व अवयव यांच्याशी निगडित आजारांवर आयुर्वेदिक उपचार करण्यात आले. त्यासाठी डॉ. सातपुते यांच्यासह 15 हेल्थ कंसल्टंट आणि आरोग्य स्टाफ हजर होता.

आयुर्वेदिक शिबिरात चामखीळ,भोवरी तात्काळ काढून टाकण्यात आल्या, तर गुडघेदुखी,खांदे दुखी,कंबर दुखी,पाठ दुखी,वात,आम वात,पित्त,अग्निकर्म,विध्दकर्म, रक्तमोक्षण,दूषित रक्त काढणे आदींसह विविध आजरांवर उपचार करण्यात आले.240 रुग्णांनी यावेळी आपली चिकित्सा करून घेतली आणि त्यावेळी त्या सर्व रुग्णांना नारी सामाजिक संघटना यांच्याकडून मोफत औषधे वाटप करण्यात आली.हे शिब्बीर गोविंद दुग्धालय यांच्या वतीने तातोबा ठोंबरे भीमाबाई ठोमरे यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आले होते.या शिबिरचे यशस्वीतेसाठी माजी आमदार तुकाराम सुर्वे प्रतिष्ठान यांच्यासह भरत ठोंबरे आणि सहकारी यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version