। नेरळ । प्रतिनिधी ।
अखिल पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया व हिंद (आरक्षी) पोलीस फ्रेंड असोसिएशन नवी दिल्ली संघटनेच्यावतीने आपण आपल्या परिसरात किमान पाच तरी झाडे लावून ती जगवली पाहिजेत, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. यावेळी पर्यावरण दिनाच्या निमित्ताने कर्जत तालुक्यातील कोशाने येथे अखिल पोलीस मित्र सुरक्षा परिषद यांच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. त्यानिमित्ताने लहान मुलांचे हस्ते झाडे लावण्यात आली. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन लोंगले, प्रदेश ज्येष्ठ सल्लागार उत्तम ठोंबरे, संतोष पवार, पारस साळोखे, गोविंद सांबरी, शांताराम मिरकुटे व दिनेश कांबरी आदी उपस्थित होते.







