। उरण । वार्ताहर ।
‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून 5 जून रोजी सरकार आणि शासकीय कार्यालयांत मोठ्या थाटामाटात कार्यक्रम झाले. मात्र, प्रत्यक्षात उरण तालुक्यात पर्यावरणाचा चिरडलेला श्वास आणि अधिकार्यांच्या खिशात गडगडणारी नोटांची थैली हेच वास्तव ठळकपणे समोर येत असल्याचे स्थानिकांमधून बोलले जात आहे. तसेच, ‘झाडे लावा, झाडे जगवा’, ‘प्लास्टिक बंदी’, ‘हरित उरण’ अशा घोषणा हवेत झुलत राहत असून येथील झाडे कापली जात आहेत, प्लास्टिक वापरले जात आहे, तसेच अनधिकृत माती उत्खननदेखील सुरूच आहे. त्यामुळे संबंधित प्रशासन हे ‘कागदावर हिरवं’ दाखवण्याचे नाटक दरवर्षी नव्याने रंगवत आहे, असा आरोप देखील स्थानिक आणि पर्यावरण प्रेमींकडून होत आहे.