माळरानावर वृक्षारोपण

| चिरनेर | वार्ताहर |

माझी वसुंधरा योजनेअंतर्गत विविध प्रकारच्या 165 झाडांची लागवड चिरनेर ग्रामपंचायतीच्यावतीने, चिरनेर येथील बापूजी देवाच्या दंडावरच्या माळरानात सरपंच भास्कर मोकल, उपसरपंच सचिन घबाडी, ग्रामविकास अधिकारी महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या झाडांच्या संगोपनाची जबाबदारीही घेतली आहे. चिरनेर ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी या सर्वांच्या सहकार्याने विविध प्रकारच्या झाडांची लागवड करण्यात आली.

यावेळी चिरनेर ग्रामपंचायतीचे सदस्य तथा निसर्गप्रेमी समाधान ठाकूर, दीपक कातकरी, मृणाली ठाकूर, नीलम चौलकर, समुद्रा म्हात्रे, निकिता  नारंगीकर, भारती ठाकूर, वनिता गोंधळी, कर्मचारी मानसी  म्हात्रे, शोभा ठाकूर, संताजी ठाकूर, सुनील ठाकूर, भारत पेणकर, संदेश नारंगीकर तसेच अन्य जण उपस्थित होते.

Exit mobile version