आमटेम येथे वृक्षारोपण

। पेण । प्रतिनिधी ।

केंद्रशाळा आमटेम येथे शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व वनविभाग निगडे यांच्या संयुक्त विद्यमानाने 1 ते 7 जुलै हा वृक्षारोपण सप्ताह निमित्ताने सरपंच लक्ष्मण तांबोळी, जनार्दन तांबोळी, रवी, वृषाली, अस्मिता, रामफळ त्याचबरोबर ग्रामसेविका मालती पाडगे, वनविभागाचे अधिकारी वारगे, भोईर व पेडवी, मुख्याध्यापिका अनिता वावेकर, सुजाता म्हात्रे, नंदिनी पाटील, भाग्यश्री म्हात्रे, प्रतिभा कपाळे, महेंद्र पाटील व सर्व विद्यार्थी यांच्या सहकार्याने वृक्षारोपणचा कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात संपन्न झाला.

Exit mobile version