दहिवली विचारमंचच्या माध्यमातून वृक्षारोपण

। कर्जत । प्रतिनिधी ।

दहिवली गाव परिसर विचारमंचच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. बहुतांश नागरिकांनी एकत्र येते वाचनालय, डोंबे विद्यानिकेतन, छत्रपती शिवाजी महाराज नगर, नवीन गार्डन, प्रभु छाया सोसायटी रोड व बाम मळा, नवीन डीपी रोड येथे 35 रोपांची लागवड केली त्यामध्ये वड, पिंपळ, करंज, शीसंम, आवळा, पेरू, जांभुळ, बदाम आदी पारंपारिक झाडांचा समावेश होता.

मल्हारी माने, अशोक पाटील, अशोक पवार, प्रसाद डेरवणकर दामोदर कारुळकर, रमेश भागवत, चंद्रकांत जाधव, विकास चित्ते, अशोक महाडीक, सुनील जाधव, निवृत सैनिक अशोक म्हसे, अतुल पवार, जयप्रकाश जाधव, शेखर मेढी, मिलींद चिखलकर, बाळा धनवे, दिनेश कडु, पोलीस पाटील अनिल सावंत, सुशांत लाड, नंदु गुरव, संजय वरघडे, गणेश कनोजे, संदिप पावसकर यांच्यासह अन्य मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version