पीएनपी महाविद्यालयात वृक्षारोपण उत्साहात

। अलिबाग । प्रतिनिधी ।
प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेच्या कार्यवाह चित्रलेखा नृपाल पाटील उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ओमकार पोटे, प्रा. विक्रांत वार्डे, प्रा. रविंद्र पाटील, प्रा. तेजस म्हात्रे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील एकूण 76 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला. एकूण 65 वृक्षांची लागवड करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य पोटे यांनी चालू वर्षात एकूण 200 वृक्ष लागवडीच्या संकल्प नमूद केला. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी केले.

Exit mobile version