। अलिबाग । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल सोमवारी (दि.5) जाहीर करण्यात आला. त्यात अलिबागमधील जेएसएम महाविद्यालयातील बारावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. जेएसएम महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेचा सरासरी निकाल 97.64 टक्के आणि कला शाखेचा 82.35 टक्के निकाल लागला आहे.
महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून विघ्नेश थळे याने 95.83 टक्के गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केला. कला शाखेतून मानसी कंटक व भार्गवी नाईक प्रकाश यांनी 72.33 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. त्याचबरोबर विज्ञान शाखेतील मनस्वी मोरे हीने 93.67 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक तर आदित्य साखळकर याने 87.50 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच, कला शाखेतील विवेक म्हात्रे याने 70.50 टक्के व कशिश पाटील हीने 62.33 टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्विवतीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर जेएसएमच्या उपाध्यक्षा डॉ. साक्षी पाटील, सचिव गौरव पाटील, प्राचार्या डॉ. सोनाली पाटील, पर्यवेक्षक अजय सावंत व सर्व प्राध्यापकांनी बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.