आदिवासीदिनाचे नागोठणे येथे आयोजन

| कोलाड़ | वार्ताहर |

जागतिक आदिवासी दिनानिमित टी. एम.मंगल कार्यालय नागोठणे येथे 9 ऑगस्टला विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9:30 वाजता रॅली. स.12 वाजता समाज प्रबोेधन,दु.2 वा. सांस्कृतिक कार्यक्रम, सायं 4 वा गुणवंत विद्यार्थी सत्कार केला जाणार आहे.या कार्यक्रमाला आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन आदिवासी ठाकूर उन्नती सामाजिक संस्था अध्यक्ष गोविंद शीद, उपाध्यक्ष महेंद्र हंबीर, खजिनदार महेंद्र लेंडी, सचिव कमलाकर बांगारा आदींनी केले आहे.

Exit mobile version