आदिवासी विद्यार्थ्यांनी सैन्य दलात भरती व्हा

| नेरळ | वार्ताहर |

कर्जत तालुक्यातील शेवटचे टोक असणारे ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर झुगरेवाडी येथील जिल्हा परिषदे शाळेत जागतिक लष्कर दिनाचे औचित्य साधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. त्यावेळी भारतीय थळ सेनेतून 15 वर्षे सेवा देवून निवृत्त जवान मेजर कुमार गोटीराम जाधव यांनी झुगरेवाडी शाळेतील विद्यार्थी आणि परिसरातील तरुणांशी संवाद साधला. जागतिक लष्कर दिनाच्या निमित्ताने हा उपक्रम झुगरेवाडी सारख्या दुर्गम भागातील शाळेत राबविण्यात येत असल्याने सर्व शिक्षकांचे यांनी कौतुक केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये देशसेवा ओतप्रोत भरलेली असते आणि त्यामुळे खूप संधी उपलब्ध आहेत. परंतु योग्य मार्गदर्शनाचे अभावी गुणवत्ता असूनही संधी हुकते. अशावेळी सर्वांनी सावध राहून संधीचे सोने करावे असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. तरुण आणि विद्यार्थी यांना मार्गदर्शन करताना सैन्यामध्ये असणार्‍या क्लास वनपासून चतुर्थ श्रेणी पर्यतच्या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता आणि त्यासाठी आवश्यक कागदपत्रे याबद्दल मार्गदर्शन केले.

सैन्यदलातील करिअरच्या सर्वाधिक संधी असून देशसेवा करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी हे मोठे व्यासपीठ आहे. आदिवासी भागातील विद्यार्थ्यांमध्ये अंगीकृत असे गुण असतात, त्यामुळे सैन्य दलात प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत .

कुमार जाधव
निवृत जवान
Exit mobile version