| नेरळ | वार्ताहर |
कोल्हारे येथे त्रिवेणी संगमावर श्री क्षेत्र संगमेश्वर शिव मंदिर आहे. भक्त येथे दर्शनासाठी येत असतात आणि भक्तांनी शिवलिंगावर वाहण्यासाठी बेलाची पाने खरेदी करावीत म्हणून तेथील आदिवासी महिला बेलाची पाने गोळा करण्यासाठी तब्बल 30 फूट उंचीवर चढली होती. ते कशासाठी तर पोटासाठी, दोन पैसे कमविण्यासाठी असा जीवघेणा प्रयत्न पाहताना अनेकांच्या पोटात गोळा आला होता.
बेलाची पाने काढण्यासाठी चढलेली आदिवासी महिला या झाडावर तब्बल 30-35 फूट चढून पाने काढताना दिसत होती. बेलाच्या झाडाला मोठ्या प्रमाणात झाडाच्या खोडाला आणि फांद्या यांना काटे असतात. त्या काट्यांची लांबी ही दोन ते तीन इंच लांबीचे असतात, त्यामुळे ते काटे चुकवीत ही महिला बेलाच्या झाडावर अगदी तुरळक असलेली पाने असताना ती पाने काढताना त्या महिलेची कसरत प्रंचड जिद्द दाखविणारी होती. त्या आदिवासी महिलेची ती बेलाची झाडावर चढून पाने काढण्याची कसरत ही कशासाठी आहे तर पोटासाठी आणि दोन पैसे कमविण्यासाठी आहे असे स्पष्ट झाले आहे.