| मुंबई | वृत्तसंस्था |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळावा मंगळवारी (दि. 9) संध्याकाळी सहा वाजता दादरमधील शिवतीर्थ अर्थात शिवाजी पार्कवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वाचा मानला जातो. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यासाठी मनसे कार्यकर्ते मेहनत घेत आहेत.
मनसेचे माहीम विधानसभा विभागअध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी सांगितले की, कार्यकर्त्यांना सभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सभा स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पिण्याचे पाण्याचे टँकर, फायर मशीन, फिरते शौचालय, कार्डीयाक ऍम्ब्युलन्स, व्हॅनिटी व्हॅन पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. सभा स्थळी पोहचताना तसेच पोहचल्यावर नागरिकांना कोणतीही अडचण उदभवू नये याकरिता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मनसेचे 100 सुरक्षारक्षक, 500 स्वयंसेवक व 100 वोर्डन नेमण्यात आले असून सर्व ड्रॉप पॉईंट वरून सभा स्थळी पोहचण्यासाठी 50 बीएसटी शटलची व्यवस्था करण्यात आली आहे.निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय संबोधणार, कोणते सुतोवाच करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आणि त्यासाठी मनसेने योग्य अशी खबरदारी घेतली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.