हुतात्मा नाग्या कातकरी यांना कर्जत येथे अभिवादन

| नेरळ | प्रतिनिधी |

चिरनेर सत्याग्रहात हौतात्म्य प्राप्त केलेले कातकरी समाजातील तरुण हुतात्मा नाग्या कातकरी यांचा स्मृतिदिन कर्जत येथे कातकरी समाजाच्या वतीने जाहीर कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात आला. कर्जत येथील रॉयल गार्डन येथे तालुक्यातील कातकरी समाजाच्या वतीने स्मृतिदिन कार्यक्रम आयोजित केला होता. सुरुवातीला हुतात्मा नाग्या कातकरी यांच्या प्रतिमेस ज्येष्ठ कार्यकर्ते सोमनाथ वाघमारे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले. याप्रसंगी आदिवासी गायक तुकाराम हीलम यांनी नाग्या कातकरी यांच्या जीवनावरील क्रांतीगीत याचे सादरीकरण केले. यावेळी व्यासपीठावर श्याम पवार, वेच्या गावित, विलास सुपे, कृष्णा वाघमारे, प्रकाश पवार आदी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमात कातकरी समाजातील पोलीस दलात निवड झालेले तरुण बामणोली येथील प्रकाश पवार या तरुणाचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी कातकरी समाजाच्या लोकांना शासनाने आदिम जमातीमधून अनेक योजनांमधून मिळणाऱ्या सोयी सुविधा यांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजनराजेश मुकणे, रोहिदास पवार, अशोक पवार, किसन पवार, किसन वाघमारे, प्रकाश पवार, सुरेश हिलम, विलास वाघमारे, उमेश भोईर, मंगेश भोईर, रवी भोई, नामदेव हीलम, समीर वाघमारे, गजानन वाघमारे, कमल पवार, रेखा पवार, दिनेश वाघमारे, रोहन आहेर, मोहन आहेर, ज्ञानेश्वर आहेर, दर्शन वाघमारे, अरुण वाघचौरे, तुकाराम हिलम, लक्ष्मण पालकर, सोमनाथ पवार, लखु पवार, मारुती वाघमारे, वसंत पवार, विकास वाघमारे, सागर वाघमारे, तुषार जाधव, सुनील पालकर यांनी एकत्र येऊन केले होते.

हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांना अभिवादन


| पेण | प्रतिनिधी |

चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या स्मृतिदिनानिमित्त हुतात्मा नाग्या महादू कातकरी अभिवादन बाईक रॅलीचे आयोजन, तर पेण शहरामध्ये अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ब्रिटिश सरकारविरोधात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या असहकार आंदोलनाला पाठिंबा देत 25 सप्टेंबर 1930 ला झालेल्या चिरनेरच्या जंगल सत्याग्रहमध्ये शहीद झालेल्या 12 हुतात्म्यांपैकी आदिवासी समाजाचे हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या 93 व्या बलिदान दिनानिमित्त रायगड जिल्ह्यामधील आदिवासी बांधवांनी पेण ते चिरनेर अशा अभिवादन रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत शेकडो आदिवासी तरुणांनी सहभाग घेत चिरनेर येथील अक्कादेवीच्या डोंगरात असलेल्या हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तर पेण शहरात महात्मा गांधी वाचनालय ते आदिवासी प्रकल्प कार्यालयापर्यंत ढोल आणि आदिवासी वाद्यांच्या तालावर तरुण-तरुणांनी एकच ठेका धरून नाग्या बाबा तुम अमर रहो, हुतात्मा नाग्या महादू कातकरी जिंदाबाद यासारख्या घोषणाही दिल्या.

बाईक रॅलीमध्ये रायगड भूषण सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर, आदिवासी समाजाचे कार्यकर्ते सुनील वाघमारे, संतोष वाघमारे, भगवान नाईक, जितेंद्र वाघमारे, बबन वाघमारे, मुकेश नाईक, सुरेश नाईक, लहू वाघमारे, कालूराम वालेकर, सखाराम पवार, कांता वाघमारे, गीता वाघमारे, नर्मदा वाघे यांच्यासह शेकडो आदिवासी तरुण बांधव सहभागी झाले होते. तर पेण येथील अभिवादन रॅलीमध्ये रोडे सरपंच दिनेश पवार, विश्वास वाघमारे, परशुराम पवार, रणजीत पवार, अंकुश वाघमारे, कविता पवार, निरा सोमनाथ पवार, अंजु अनंत वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.

Exit mobile version