| अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था अलिबागच्या निवडणूकीत संचालक पदी निवडून आल्याबद्दल सर्वे शाळेचे शिक्षक राजेंद्र काशिनाथ पाटील (रा. का. पाटील) यांचा शाळा व्यवस्थापन समिती व सर्वे ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विजय कांगणे, उपाध्यक्ष शैलेश जाधव, कुणबी समाज अध्यक्ष हरिश्चंद्र कांगणे, माजी पोलीस पाटील व प्रतिष्ठित नागरिक नरेश धार्वे, वन समिती अध्यक्ष सुशील खोपकर, सामाजिक कार्यकर्ते संतोष सावंत, रविंद्र पाटील, तसेच दिपक येलकर, स्मीता जाधव, अरूणा ठाकूर, प्रमोदिनी महाडिक, सुर्यकांत पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.
राजेंद्र पाटील यांचा सत्कार
