पनवेलकरांकडून शूरवीरांना मानवंदना

विजय दिनानिमित्त मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

| पनवेल | वार्ताहर |

खांदा कॉलनी पनवेल येथे विजय दिवसानिमित्त (विजय रण) मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त शहीद झालेल्या जवानांना मानवंदना देऊन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली, तसेच जखमी जवानांच्या कार्यालाही उपस्थितांनी सलाम केला. या मॅरेथॉनमध्ये शेकडो पनवेलकर सहभागी झाले होते. 16 डिसेंबर 1971 च्या युद्धातील ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार ठरलेल्या भारतीय लष्कराच्या शूर जवानांच्या शौर्याला व बलिदानाला विनम्र अभिवादन करण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली.

16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. त्या युद्धात 3900 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यांना मानवंदना म्हणून गेलं सॉलिडट्रेशन (इंडिया लिमिटेड) वतीने दि. 17 डिसेंबर रोजी विजय रण मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतात विविध ठिकाणी 3, 5 आणि 21 किलोमीटरपर्यंतच्या विजय रण मॅरेथॉनचे आयोजन विजय दिनानिमित्त करण्यात येते. यावेळी शहीद झालेल्या 3900 शहिदांना मानवंदना देऊन मॅरेथॉनला सुरुवात करण्यात आली, तसेच जखमी जवानांच्या कार्यालाही उपस्थित लोकांनी सलाम केला. या मॅरेथॉनमध्ये 100 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.

या कार्यक्रमात फिटीस्तान एक फिट भारतचे कॅप्टन संजय मोरे, कॅप्टन नियती ठक्कर, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब झांजे, इंडियन नेव्हीच्या चुकार सेकंड स्कॉडर्न नेव्हल स्टेशन करंजा या टीमचे तसेच अल्केश शहा, भावेश धनेशा आणि सिद्धेश मोरे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पनवेलच्या गुड मॉर्निंग रनर्स क्लब आणि जय हिंद फिटनेस ग्रुपच्या सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानण्यात आले.

Exit mobile version