| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
रायगड जिल्ह्याचे भाग्यविधाते स्व. ॲड. दत्ता पाटील यांचा स्मृतीदिन रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. दादांच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुष्पहार घालून त्यांना वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी दादांच्या कार्याची महती सांगून जून्या आठवणींना उजाळा दिला.
रायगड जिल्हयाचे भाग्यविधाते, कोकणातील वंचित बहूजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आयुष्य वेचणारे रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते, लोकनेते स्व. ॲड. दत्ता पाटील यांचा स्मृतीदिन रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी साजरा करण्यात आला. शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने व तसेच वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या वतीने दादांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. अलिबागमधील सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयाच्या सभागृहात दादांच्या अर्थात ॲड.दत्ता पाटील यांच्या पुतळ्यास रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तथा सार्वजनिक वाचनालय आणि जिल्हा ग्रंथालयाचे ज्येष्ठ संचालक नागेश कुलकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी नागेश कुलकर्णी यांनी दादांच्या कार्याची माहिती दिली. यावेळी माजी नगरसेवक आर. के. घरत, ज्येष्ठ साहित्यिक नंदू तळकर, सामाजिक कार्यकर्ते विजय कुंटे, सार्वजनिक वाचनालय व जिल्हा ग्रंथालयालयाच्या ग्रंथपाल रंजिता माळवी, सहाय्यक ग्रंथपाल अमित धुमाळ, अपुर्वा वर्तक, अंकीत म्हात्रे आदी मान्यवरांसह वाचक वर्ग उपस्थित होते. अलिबागमधील शेतकरी भवन येथील सभागृहात कार्यकर्त्यांच्या हस्ते दादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी शेकापच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. अलिबागसह रायगड जिल्ह्यातील शैक्षणिक, सांसिकृतिक, क्रीडा, राजकीय, सामाजिक अश वेगवेगळ्या संस्था, संघटनाच्या वतीने दादांचा स्मृतीदिन साजरा करण्यात आला.
स्व. ॲड. दत्ता पाटील यांना अभिवादन
