साहित्यिक वसंत पाटील यांना आदरांजली

| चिरनेर | वार्ताहर |

ज्येष्ठ साहित्यिक वसंत भाऊ पाटील हे साहित्यातील वसंत ऋतू होते. त्यांनी साहित्याची साधना केली. त्यांचे साहित्य भावी पिढीला प्रेरणादायी असेच आहे. असे प्रतिपादन कवयित्री मिनल माळी यांनी केले.


चिरले येथे काव्य दरबार उरणच्या वतीने, आयोजित करण्यात आलेल्या अमृत महोत्सवी संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक वसंत भाऊ पाटील यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यावेळी माळी या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक हरिभाऊ घरत, रामचंद्र म्हात्रे, जगन्नाथ जांभळे, चंद्रकांत पाटील, मोहन भोईर, दमयंती भोईर, चंद्रकांत मढवी, म.वा. म्हात्रे, प्रकाश ठाकूर, शंकर माळी, स्मिता वाजेकर, अरुण म्हात्रे, राजेंद्र नाईक तसेच अन्य जण उपस्थित होते. के.एम. मढवी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

Exit mobile version