बांग्लादेशमुक्ती संग्रामातील शहिदांना श्रद्धांजली

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बांग्लादेश स्वातंत्र्य युद्धात शाहिद झालेल्या शहिदांना अलिबाग तालुका काँग्रेस कमिटीतर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार अलिबाग येथील बॅरिस्टर अंतुले भवन येथे हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 1970 च्या पाकिस्तान मधील सार्वत्रिक निवडणुकीत पूर्व पाकिस्तानातील अवामी लिगने 169 मधील 167 जागा जिंकल्या व इस्लामाबाद मधील संसदेत अवामी लिगचे बहुमत झाले. अवामी लिगचे नेते मुजिबुर रहमान यांनी राष्ट्राध्यक्षांपुढे सरकार स्थापनेचा दावा सादर केला. झुल्फिकार भुट्टो यांनी मुजिबूर यांना पंतप्रधान होण्यास विरोध केला. राष्ट्राध्यक्ष याह्याखान यांनी पूर्व पाकिस्तानात सेनेला तैनात केले. पूर्व पाकिस्तानातील 40 लाखांचे शिरकाण करण्यात आले. त्यातले 30 लाख हिंदू होते. 27 मार्च 1971 रोजी भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पूर्व पाकिस्तानात चालू असलेलल्या बांगलादेशासाठीच्या स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण पाठिंबा जाहीर केला आणि भारताचे लष्कर प्रमुख समॅ मानेकशॉ यांचे नेतृत्वाखाली युद्धाला परवानगी देऊन पाकिस्तानापासून बांग्लादेश हा नविन देश निर्माण केला. त्या घटनेला 50 वर्ष बांग्लादेशमुक्ती संग्रामाला पूर्ण झाली. या युद्धात शाहिद झालेल्या भारतीय शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी रायगड जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा अ‍ॅड.श्रद्धा ठाकुर, अलिबाग तालुका काँग्रेस अध्यक्ष योगेश मगर, अलिबाग-मुरुड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड.कौस्तुभ पुनकर, प्रज्वल पडोले, संदीप म्हापणकर, भूषण मगर, प्रणय पोईलकर, राहुल झावरे आदी उपस्थित होते.

Exit mobile version