| उरण | प्रतिनिधी |
माँसाहेब मीनाताई बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शनिवारी (दि.6) शिवसेना उरण शहर शाखेत व माँसाहेब मीनाताई ठाकरे वाचनालयात माजी आमदार मनोहर भोईर व नरेश रहाळकर यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच, उरण तालुक्यातील व शहरातील तमाम शिवसैनिकांनी उरण शहर शाखेत येऊन भावपूर्ण आदरांजली वाहिली. यावेळी माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. यावेळी शहरप्रमुख विनोद म्हात्रे, शहर संपर्कप्रमुख गणेश म्हात्रे, माजी उपनगराध्यक्ष परमानंद करगुटकर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटिका ममता पाटील यांच्यासह सुजाता गायकवाड, वंदना पवार, मेघा मेस्त्री, माधुरी चव्हाण, संगीता लोळगे, संजना कोष्टी, दीप्ती लोळगे, रेश्मा भोईर, निरंतर कदम, सूर्यकांत दरणे, पप्पू काठे, घनश्याम कडू, अजय म्हात्रे, सचिन पाटील, अनिल पाटील, संदेश पाटील, सुशांत तांडेल, संदीप पाटील, नंदू पाटील, संजय मेश्राम व सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
उरणमध्ये मीनाताई ठाकरे यांना आदरांजली
