| उरण | प्रतिनिधी |
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 व्या जयंतीनिमित शुक्रवारी (दि.23) रोजी माजी आ. मनोहर भोईर, नरेश रहाळकर, गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उरण शहर शाखेतर्फे अभिवादन करण्यात आले. हे वर्षे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळे उरण शहरात शिवसेना शहर शाखेतर्फे विविध सामाजिक, शैक्षणिक व सहकार क्षेत्रातील कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, दिलीप रहाळकर, परमानंद करंगुटकर, सूर्यकांत दरणे, वंदना पवार, मेघा मेस्त्री, विना तलरेजा, माधुरी चव्हाण, रूपा सिंग, लता राठोड, शादाब शेख, मुमताज भाटकर, सायरा खान, सलीमा शेख, यशस्वी म्हात्रे, घनश्याम कडू, महेश वर्तक, मिलिंद भोईर, इस्माईल शेख, अनिल पाटील, कमलाकर पाटील, रमाकांत म्हात्रे, अप्पा पठारे, मेहता, उमेश गीध, शिवा म्हात्रे, ओमकार घरत, तालुका संघटक कुणाल पाटील, संदेश पाटील, अभिषेक भोईर, फतेह खान, सर्वेश गवस, सिद्धेश म्हात्रे, सर्व आजी-माजी पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना, अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
