एसटीबसमधून डिझेल चोरणारे त्रिकुट गजाआड

| पनवेल | वार्ताहर |

तालुक्यातील केळवणे गावाच्या हद्दीत उभ्या असलेल्या एसटी बसमधून डिझेल चोरणाऱ्या त्रिकुटाला पनवेल तालुका पोलिसांनी ताब्यात घेतलेआहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यात वापरलेली गाडी सुद्धा हस्तगत करण्यात आली आहे. आरोपी सिद्धार्थ साठे (24) रा. कोपरखैरणे, सोहेल खान (23) रा. तुर्भे व ऐरिस चाडी (21) रा. वाशी यांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

तालुक्यातील केळवणे गावाच्या हद्दीत आर्यन फर्निचर समोर दोन एसटी बस उभ्या करण्यात आल्या होत्या. सदर बसमधून अज्ञात चोरटयांनी जवळपास 38 हजार 70 रुपये किमतीचे डिझेल चोरले होते. याबाबत पनवेल तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय गळवे, पोलिस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, पोलिस हवालदार सुनील कुदळे, महेश धुमाळ, सतीश तांडेल, रवी म्हात्रे, भीमराव खताळ, तुकाराम भोये, आकाश भगत आदींच्या पथकाने सदरची कारवाई केली.

Exit mobile version