कार्लेखिंडीत तिहेरी अपघात

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग-पेण मार्गावरील कार्लखिंड येथे तिहेरी अपघात झाला आहे. यातील एका वाहनामध्ये न्यायाधीश असल्याची माहिती समोर येत आहे.
या अपघातामध्ये वाहनांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

विधी सेवा प्राधिकरण रायगड विभागाचे सचिव तथा न्यायाधीश अमोल शिंदे शनिवारी (दि.५) सायंकाळी एका खासगी वाहनाने कार्यक्रमाला जात होते. दरम्यान, कार्लेखिंडीत आल्यावर मागून एका चारचाकी वाहनाची धडक त्यांच्या गाडीला लागली. त्या चारचाकी वाहनाला त्याच्या मागील एका वाहनाची धडक लागल्याने हा तिहेरी अपघात झाला आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोयनाड पोलिसांनी दिली आहे.

Exit mobile version