धक्कादायक! दोन ट्रकचा अपघात; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

| खोपोली | वार्ताहर |
एक्सप्रेस वेवर बोरघाटात दोन ट्रकचा अपघात झाला. यामध्ये एक ठार, तिघे जखमी झाले. हा अपघात गुरुवारी पहाटे घडला. पुण्याहून मुंबईकडे निघालेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याची दुसऱ्या मार्गिकेवरुन मधून जाणाऱ्या अन्य एका ट्रकला पाठीमागून धडक दिली.त्यामुळे तो ट्रक पहिल्याम मार्गिकेवर पलटी झाला.

अपघातात काचेने भरलेल्या ट्रकमधील चालक सदानंद पाटील (वय 43) व तीन जण जखमी झाले. यातील एक जण प्रवासी हे केबिनमध्ये अडकून होते त्यांना आयआरबी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा आणि बोरघाट पोलीस यांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले.

जखमींना गंभीर दुखापती झाल्याने लोकमान्य हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेनेे पवना ट्रॉमा केअर हॉस्पिटल येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. सदर अपघात हा खोपोली पोलीस स्टेशनच्या हद्दीत असल्याने पोलीस निरीक्षक शितल राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. या अपघातामुळे मुंबई लेन 4 तास बंद होती. मात्र लहान वाहनांसाठी ट्रॅफिक दुसऱ्या बाजूने सुरू होती तर अवजड वाहनांना मात्र वाहतूक सुरळीत होईपर्यत थांबावे लागले, अशी माहिती बोरघाट वाहतूक पोलीस निरीक्षक योगेश भोसले यांनी माहिती दिली आहे.

Exit mobile version