ट्रक चालकांचे होणार मोफत लसीकरण

। उरण । वार्ताहर ।
भारताचे प्रमुख कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) मध्ये आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी, भा.प्र.से. यांनी उपाध्यक्ष उन्मेश शरद वाघ, भा.रा.से.यांच्या उपस्थितीत जेएनपीटी बंदरा लगत असलेल्या सेंट्रलाइज्ड पार्किंग प्लाझा (सीपीपी) येथे ड्राइव्हर्स सेव्ह लाइफ फाउंडेशन आणि एनरिक लाइव्ह्स फाउंडेशनच्या सहकार्याने कंटेनर ट्रक चालकांसाठी मोफत कोव्हिड-19 लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला.
यावेळी जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, ट्रक चालक हे सागरी पुरवठा साखळीचा अविभाज्य भाग आहेत. कोव्हिड-19 साथीच्या काळात जेएनपीटीने कोव्हिडचा सामना करण्यासाठी आघाडीवर राहून अनेक उपाययोजना केल्या व देशातील पुरवठा साखळीतील प्रत्येक घटकाला पाठिंबा देऊन एक सक्षम आयात-निर्यात व्यापार सुनिश्‍चित केला. त्या अंतर्गत ट्रक चालकांसाठी सुरू केलेली ही मोफत लसीकरण मोहीम एक महत्वाचा उपक्रम ठरणार आहे.

Exit mobile version