| पनवेल | प्रतिनिधी ।
रस्ता क्रॉस करत असताना ट्रक चालकास थांबवण्यासाठी हात दाखवला असता त्याने न थांबता बावीस वर्षीय तरुणाला धडक देऊन झालेल्या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला. या अपघाताप्रकरणी आयशर कंपनीच्या ट्रक चालका विरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील जतिन सोनी हा रोडपाली, कळंबोली येथे राहत असून पुरुषार्थ ब्रिज कळंबोली येथून वाशीच्या दिशेने रस्ता क्रॉस करत असताना रोडपाली सिग्नलच्या दिशेने ट्रक भरधाव वेगाने येताना दिसला. यावेळी त्याने ट्रक चालकास थांबवण्यासाठी हात दाखवला. मात्र, त्याने न थांबता जतीन सोनी याला धडक दिली. आणि त्याच्या दोन्ही पायांवरून ट्रक घालून दोन्ही पायाला व हाताला गंभीर दुखापती झाल्या आणि त्यानंतर ट्रक चालक तेथून ट्रक घेऊन पळून गेला.
ट्रकची तरुणाला धडक, तरुण गंभीर जखमी
