| पनवेल | वार्ताहर |
पनवेल शहरातील ठाणा नाका येथील ब्रिजवर ट्रक पलटी झाल्याची घटना पहाटे घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही.ठाणा नाका येथील ब्रिजवर या ट्रक वरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि तो पलटी झाला. सुदैवाने यावेळी ब्रिजवर वाहतूक कमी होती. पहाटे ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी कमी होती. मात्र याची माहिती वाहतूक पोलिसांना तात्काळ देण्यात आली. पोलिसांनी एका बाजूने वाहतूक सुरू केली व काही वेळानंतर हा ट्रक तेथून काढण्यात आला. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.
पनवेल-सायन महामार्गावर ट्रक पलटी
