पालखी मार्ग दुरुस्तीसाठी ट्रस्टचा पुढाकार

| पाली | वार्ताहर |
गुरुवारी पाली शहरातून श्री बल्लाळेश्‍वराची पालखी काढण्यात येईल. शिवाय येथे मोठी जत्रा देखील भरते. मात्र निधी अभावी नगरपंचायत मार्फत पालखी रस्त्याचे काम पूर्ण झालेलं नाही. अखेर बल्लाळेश्‍वर देऊळ ते लावटे चौक पर्यंतच्या पालखी मार्ग दुरुस्तीसाठी बल्लाळेश्‍वर देवस्थानने निधी देण्याचे मंजूर केल्यावर नगरपंचायत तर्फे रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली आहे. विशेष म्हणजे शहरातील इतर अंतरंग रस्त्यांना निधी येऊन त्यांचे काम पूर्ण झाले आहे. परिणामी ग्रामस्थ व गणेशभक्त नाराज झाले आहेत.

पाली शहरातील इतर अंतर्गत रस्त्यांना मोठा निधी मंजूर झाला आहे. तुणची कामे देखील मार्गी लागतील. मात्र पालखी रस्त्याला निधी मिळालेला नाही. पालीतील प्रकाश राईस मिल ते लवाटे चौक (नगरपंचायत कार्यालय) या रस्त्यासाठी अंदाजे 60 लाख रूपये, जुना एसटी स्टँड ते विक्रम स्टॅन्ड पर्यंत अंदाजे 60 लाख 75 हजार रुपये खर्च करून तसेच अनधिकृत बांधकाम तोडून रस्त्याचे कामे सुरू आहे. असे असतांना या महत्वाच्या रस्त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

नगराध्यक्ष पदाची सूत्रे महिनाभरापूर्वी हाती घेतली आहेत. त्यावेळी ज्या रस्त्यांच्या कामांना मंजुरी व निधी आला होता ती कामे पूर्ण करण्यात आली आहेत. बल्लाळेश्‍वर पालखी मार्गाला निधी व मंजुरी मिळाली नव्हती. मात्र देवस्थान ट्रस्टच्या मदतीने हा रस्ता लागलीच दुरुस्त केला आहे. या मार्गाला देखील मंजुरी व निधी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवला आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यावर लागलीच या रस्त्याचे काम सुद्धा लागलीच करण्यात येईल.असे नगराध्यक्ष प्रणाली शेळके यांनी सांगितले.

Exit mobile version