पूरग्रस्तांना टिटीचे इंजेक्शन

। नेरळ । प्रतिनिधी ।
भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय सेलच्या माध्यमातून कर्जत शहरात उल्हासनदीला आलेल्या महापुरातील पूरग्रस्तांना टिटीचे इंजेक्शन देण्यात येत आहेत. पुराचे पाणी घरात गेलेल्या कर्जत शहरातील सर्व पूरग्रस्तांना इंजेक्शन दिली जात आहेत. भारतीय जनता पार्टी कर्जत शहर आणि भारतीय जनता पार्टी वैद्यकीय सेलच्या संयुक्त विद्यमाने पूरग्रस्तांना टिटी इंजेक्शन देण्याचा कॅम्प आयोजित केले आहेत. कर्जत शहरातील पूरग्रस्त शनि मंदिर परिसरातील 37 नागरिकांना टिटीचे इंजेक्शन्स देण्यात आली. त्याचबरोबर कर्जत शहरातील प्रभाग पाचमध्ये पूरग्रस्त लोक जी होती अशा 54 लोकांना टिटीची इंजेक्शन देण्यात आली.कर्जत शहरातील प्रभाग दोन येथे 95 नागरिकांना देखील इंजेक्शन्स मोफत देण्यात आली. भाजप वैद्यकीय सेलच्या मोहिमेबद्दल संयोजक राहुल कुलकर्णी यांचे कौतुक होत आहे.

Exit mobile version