घारापुरीत क्षयरोग मुक्ती जनजागृती

| चिरनेर | प्रतिनिधी |

क्षयरोग मुक्त गाव योजनेअंतर्गत जिल्हा आरोग्य पथकाकडुन घारापुरी बेटावर पाहणी दौरा आणि जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली होती. घारापुरी येथे आयोजित मोहिमेत जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सचिन जाधव, उरण वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाबासो काळेल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र ईटकरे, वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती अडेलकर यांनी भेट देऊन क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत पडताळणी केली. राष्ट्रीय आरोग्य दूरीकरण कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाच्या जनजागृतीमध्ये लोक सहभाग वाढविणे, लवकर निदान आणि उपचाराची माहिती देणे, क्षयरोग रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांना आधार देणे, रुग्णांना उपचारांसाठी प्रवृत्त करणे आणि क्षयरोगापासुन सुरक्षित राहून काळजी घेणे या बाबतीत उपस्थित आरोग्य अधिकार्‍यांकडून जनजागृती करण्यात आली.

या क्षयरोग मुक्त ग्रामपंचायत अभियान अंतर्गत राबविण्यात आलेल्या मोहिमेत ग्रामपंचायतीच्या सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकुर, सदस्य सचिन लाड, सदस्या हेमाली म्हात्रे, अरुणा घरत, नीता ठाकुर, भारती पांचाळ, ग्रामसेवक पवित्र कडु, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक उपस्थित होते.

Exit mobile version