शेकाप मुरुड तालुका चिटणीसपदी तुकाराम पाटील

| कोर्लई | प्रतिनिधी |

अलिबाग येथील भारतीय शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी भवनात झालेल्या बैठकीत मुरुड तालुक्यातील वाणदे येथील पक्षाचे ज्येष्ठ नेते व पाटील परिवाराचे विश्वासू सहकारी म्हणून परिचित तुकाराम पाटील यांची शेकापच्या मुरुड तालुका चिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील तसेच महाराष्ट्र प्रवक्त्या चित्रलेखा पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, जिल्हा चिटणीस सुरेश खैरे, राज्य महिला आघाडी प्रमुख मानसी म्हात्रे, उपजिल्हा चिटणीस गौतम पाटील, द्वारकानाथ नाईक, कार्यालयातील चिटणीस अजय झुंझाराव, तेजस्विनी घरत, राम राणे, मनोहर बैले, जिल्हा चिटणीस मंडळातील सर्व सदस्य, 15 तालुक्यांतील तालुका चिटणीस, मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी शेकापच्या मुरुड तालुका चिटणीसपदी नियुक्ती झाल्याबद्दल तुकाराम पाटील यांनो जयंत पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. दरम्यान, नातेवाईक, मित्रपरिवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तुकाराम पाटील यांचे कौतुक व अभिनंदन केले जात आहे. शे.का.पक्षाचे स्व. प्रभाकर पाटील, स्व. ॲड. दत्ता पाटील व स्व. मीनाक्षी पाटील परिवाराचे विश्वासू सहकारी परिचित आहेत.

Exit mobile version