खारआंबोली सोसायटीच्या चेअरमन पदी तुकाराम पाटील

। मुरूड जंजिरा । वार्ताहर ।
मुरूड तालुक्यातील खारआंबोली येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक सहा. निबंधक श्री वाघमारे यांच्या उपस्थितीत होऊन यामध्ये चेअरमनपदी वाणदे गावचे शेकापक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते तुकाराम पाटील यांनी चेअरमन पदी तर अशोक नाक्ती यांची व्हॉइस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी संचालक मनोज भगत, विजय गिदी, अजित कासार, प्रदीप दिवेकर, दामोदर पाटील, पांडुरंग जाधव, श्री शामा, चंद्रकांत कमाने, रमेश दिवेकर आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. मनोगत व्यक्त करताना तुकाराम पाटील म्हणाले की, शेकापक्षाचे वरिष्ठ नेते आ. जयंत पाटील,माजी आमदार पंडित पाटील, आस्वाद पाटील, चित्रलेखा पाटील, यांनी आपल्यावर टाकलेला विश्‍वास सार्थ करताना विविध योजना शेतकर्‍यांसाठी खर्‍या अर्थाने राबवून शेतकर्‍यांना जास्तीत जास्त फायदा करून देईन.

Exit mobile version