अलिबाग नगरपरिषदमध्ये तुकडोजी महाराज जयंती साजरी

। अलिबाग । वार्ताहर ।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अलिबाग नगर परिषदेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शनिवारी जयंती साजरी करण्यात आली. तसेच त्यांनी आपल्या भजन व किर्तनामधून जगाला अंधश्रद्धा निर्मूलन व जातीभेद निर्मूलन करीता जे अमूल्य समाज प्रबोधन केले त्याबाबत तसेच स्वच्छ अलिबाग सुंदर अलिबाग याबाबत आम्हीही दैनंदिन जीवनात त्यांनी सांगितलेल्या तत्वांवर चालूया अशी सर्वांनी शपथ घेतली.
यावेळी अलिबाग नगर परिषदेचे राजकुमार महाजन माहिती अधिकारी, नामदेव जाधव आरोग्य विभाग प्रमुख, अरुण अहेराव पाणी पुरवठा लिपिक, चंद्रशेखर गिरकर माहिती अधिकारी कर वसुली विभाग प्रमुख, हरिश्‍चंद्र कुंडल विद्यत विभाग प्रमुख, राजेंद्र बोरे शिक्षण विभाग, मीना थळे कर विभाग, चंद्रकांत पाटील पाणीपुरवठा विभाग, संजय कांबळे नगराध्यक्ष सचिव, प्रसाद केदारी, मंगेश गायकवाड, रवींद्र गायकवाड, वैशाली घरत, इकोसत्व प्रतिनिधी मल्हारी पंडित व राहुल निकम आदी उपस्थित होते.

Exit mobile version