। पाताळगंगा । वार्ताहर ।
बदलत्या युगात माणूस बदलत चालाल असला, तरी सुद्धा भारतीय संस्कृती ग्रामीण भागात जोपासली जात आहे. यामुळेच हिंदू संस्कृतीत तुलसी विवाह सोहळ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान पहावयास मिळत आहे. तुलसी विवाह झाला की लग्नाचा शुभ मुहूर्त काढत असतात.तसेच दिवाळी या सणाची सांगता होत असते. तुलसी विवाह झाल्याशिवाय घरातील शुभविवाह न करण्याची प्रथा आजही पाळली जाते. ग्रामीण भागात दरवर्षी तुलसी विवाहाला अंगण तयार करून लालमातीने सारवले जाते. पुरोहित अथवा गावातील नागरिक मंगलाष्टक म्हणत अक्षता टाकून विवाह पार पाडत असतात.
तुलसी विवाहाने दिवाळीची सांगता
