जुळ्या बहिणींची कमाल‌

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

सौम्या-अस्मि पाटील दोघींनाही 92 टक्के

| अलिबाग | प्रतिनिधी |

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी (दि.8) जाहीर झाला. यामध्ये अलिबाग तालुक्यातील शेखाचेगाव-कनकगिरी येथील जुळ्या बहिणींनी नेत्रदीपक यश संपादन करत तालुक्याच्या नावलौकिकात भर घातली आहे. सौम्या पाटील हिने 92.4 टक्के, तर तिची जुळी बहीण अस्मि पाटील हिने 92.20 टक्के गुण मिळवले आहेत. दोघींनाही जवळपास समान गुण मिळाल्याने ‌‘जुळ्या बहिणींची कमाल‌’, अशी चर्चा संपूर्ण अलिबाग तालुक्यात रंगली आहे. दोघीही जन्मापासून एकत्र, शाळा एकच, वर्ग एकच आणि आता दहावीचा निकालही जवळपास सारखाच लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जुळ्या बहिणींच्या या अभूतपूर्व यशामुळे शेखाचेगाव-कनकगिरीसह संपूर्ण अलिबाग तालुक्यातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ग्रामस्थ, नातेवाईक आणि शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी पाटील कुटुंबियांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावरही पाटील भगिनींची कमाल असे म्हणत अनेकांनी पोस्ट शेअर केल्या आहेत.

Exit mobile version