। महाड । प्रतिनिधी ।
महाड नांगलवाडी येथील अडीच वर्षीय मुलाचा पाण्याच्या टाकीत मृतदेह सापडला आहे. सुधीर भगवान झुजम यांच्या फिर्यादीनुसार ते सर्वजण कुटुंबासह मुलगी बघण्याचे कार्यक्रमासाठी नांगलवाडी महाड येथील मनोहर महाडीक यांच्या घरी आले तेथे मुलीचे लग्न ठरवून घरी जाण्यासाठी निघाले असता त्यांचा मुलगा श्रेयांस वय अडीच वर्षे हा कुठेतरी गेला असावा त्यासाठी त्याचा शोध घेण्यासाठी तो घराच्या पाठी मागील पाण्याच्या टाकीत पडलेला पाहिले. त्याला उपचाराकरीता महाड ग्रामीण रुग्णालया महाड येथे आणले असता त्याला तेथील डॉक्टरांनी मृत घोषित केले.