पाळीव प्राण्यांची कत्तल करणार्‍या अन्य दोघांना अटक; दोघांचा शोध सुरु

। आगरदांडा । वार्ताहर ।
गारंबी धरणावर जाणार्‍या रस्त्याच्या अलिकडील भागात एका झुडपात पाच पाळीव प्राण्यांची कत्तल केल्याप्रकरणी मुरुड पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. अमान मुर्तुजा घारे, रा. डोंगरी, एहसान हशमतुल्ला कुरेशी, कुर्ला अशी आरोपींची नावे आहेत.

या दोघांनाही तीन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. कत्तल प्रकरणात सर्व आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. अद्यापही जाफर कुरेशी व नूर महंमद इसाकच्ची (उर्फ पापा) फरार असून त्यांना अटक करण्यासाठी दोन विशेष पथके तयार करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतिग्रे यांनी दिली.

Exit mobile version