गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक

दुचाकीसह 81 हजारांचा मुद्देमाल जप्त

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेल परिसरात अमली पदार्थांची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 151 ग्रॅम गांजा, प्लास्टिकची पिशवी आणि हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण 81 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पनवेलमधील साईबाबा मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत सचिन देवनारायण मोरया (वय 27, रा. शिवनेरी सोसायटी, सेक्टर 15, कळंबोली) आणि इरफान इमाम खान (वय 23, रा. मनीषा पॅराडाईज इमारत, सेक्टर 17, कळंबोली) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच, त्यांच्याकडून हिरवट पाने, फुले, काड्या व बिया असलेला गांजासदृश अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या गांजाचे वजन 151 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 11 हजार 550 रुपये आहे. तसेच 70 हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर मोटारसायकलही पोलिसांनी जप्त केली.

याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई वापोनि बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अभिजित पाटील, पोउपनि किरण राऊत, पोना सम्राट डाकी, पोना अनिल चव्हाण, पोशी साईनाथ मोकल आणि पोशी दत्ता जाधव यांच्या पथकाने केली.

Exit mobile version