जमिनीच्या वादातून दोघांना मारहाण

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंगाचा गुन्हा दाखल

| महाड | प्रतिनिधी |

हॉटेल जमिनीबाबत असलेल्या जुन्या वादातून एका जोडप्याला आठ जणांनी जिवे मारण्याचा प्रयत्न करून जातिवाचक शब्दप्रयोग व अश्लील वर्तन केल्याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 19 जून रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास हॉटेल मेजवानी किचनमध्ये घडली.

प्रथमेश विजय जाधव, रा. डोंगरीपूल, एमजी रोड, महाड-रायगड यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, महाड शहर पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना नुकतीच महाड शहरात घडली आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी यांच्यात शहरातील एम.जी. रोड येथील हॉटेल मेजवानी या हॉटेलच्या किचनच्या जागेवरून जुना वाद होता. याच वादावरून गुरुवार, 19 जून रोजी दुपारी सव्वादोनच्या सुमारास आरोपींनी तक्रारदार व त्यांच्या पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न करीत अश्लील वर्तन व जातिवाचक शब्दप्रयोग केले. दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी प्रसाद रामकृष्ण जाधव, पूजा प्रसाद जाधव, दर्शन प्रसाद जाधव, यश प्रसाद जाधव, रोशनी यश जाधव, निर्मला सावंत, साहिल सावंत, प्रवीण सावंत, सर्व राहणार काकरतळे महाड-रायगड यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंग व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, घटनेचा अधिक तपास डीवायएसपी शंकर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली महाड शहर पोलीस करीत आहेत.

Exit mobile version