नेरळमध्ये भरवस्तीत दोन घरफोड्या

| नेरळ | प्रतिनिधी |
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील राम मंदिर व गंगा नगर या भर नागरीवस्तीत दोन ठिकाणी चोरीचा प्रकार घडला.घर मालकाने दाराला कुलूप लावताच क्षणी घरातील कपाट फोडून चोरांनी किमती वस्तू साफ करत पळ काढला. जुन्या बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणार्‍या राम मंदिर जवळ राहणारे हर्षद माणिकलाल शहा यांच्या घरी सायंकाळी सातच्या सुमारास चोरी झाली आहे. घरातील तीन कपाटे फोडून चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेले आहेत. नेरळ पूर्व परिसरात येत असलेल्या गंगा नगर येथे देखील अज्ञात चोरट्यानी अनिल मसणे यांच्या घरीतील गॅलरीतुन प्रवेश करत कपाटातील रोख रक्कमेसह सोन्याचे किमती सामान व काही दागिने चोरांनी लंपास केलेत. अनिल मसणे यांच्या घरी दुपारी ही चोरी झाली आहे.त्यावेळी चोराने शेजारील दुसर्‍या इमारती मधून प्रवेश करत चोरी केली आहे.भर वस्तीत येत असलेल्या या ठिकाणी ह्या चोर्‍या झाल्या असून कुटुंबातील व्यक्ती हे घरातून सायंकाळच्या सुमारास घराबाहेर पडता क्षणी चोरी झाल्याचं येथील घर मालक यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Exit mobile version