सात भारतीयांसह 65 जण बेपत्ता
। नेपाळ । वृत्तसंस्था ।
नेपाळमध्ये दरड कोसळल्याने प्रवाशांसह दोन बस त्रिशूली नदीत वाहून गेल्या. यामध्ये जवळपास 65 जण वाहून गेले असून यात सात भारतीयांचा समावेश आहे.
नारायणघाट-मुगलिंग रस्त्यालगत सिमलताल परिसरात दरड कोसळल्याने काठमांडूहून निघालेली एंजल बस आणि गौरकडे जाणारी गणपती डिलक्स बस अशा दोन बस प्रवाशांसह त्रिशूली नदीत वाहून गेल्या. हि घटना शुक्रवारी पहाटे 3.30 च्या सुमारास घडली आहे. एंजेल बसमध्ये 24 प्रवासी तर, गणपती डिलक्समध्ये 41 प्रवासी असे जवळपास 65 प्रवासी होते. तर, यामध्ये सात भारतीय प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
या दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू असून, भूस्खलनाचा ढिगारा हटवला जात आहे. तर, बचावकार्यासाठी पोलीस आणि सशस्त्र दलही सहभागी झाले आहेत.
