महाडमध्ये दोन कारचा अपघात; पाचजण जखमी

| महाड | प्रतिनिधी |
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास महाड शहरा नजीक सीमा गार्डन हॉटेल समोर दोन कार समोरा समोर आल्याने अपघात झाला. या अपघातात दोन्ही कार मधून 5 प्रवासी जखमी झाले सर्व जखमींवर महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले.


मुंबई बाजूकडे जाणारी स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच 04 जी यु 6609 या कारला गोवा दिशेला जाणारी एक्स यु वी क्रमांक एम एच 01 डी टी 6654 ही एका वाहनाला ओव्हर टेक करताना विरुद्ध दिशेने येऊन आपटली, या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दोन्ही वाहना मधील रवींद्र पंढरीनाथ तावडे -61, मनाली रवींद्र तावडे -25 दोन्ही राहणार उमर खाडे मुंबई , समीर शशिकांत कदम – 41 कळवा ठाणे , नलीनी बाबा ठाकूर -50 भांडुप , विहान समीर कदम -5 कळवा ठाणे असे पाच प्रवासी जखमी झाले . अपघाताची माहिती महामार्ग वाहतूक पोलीस शाखा महाड यांना मिळताच पोलीस हवालदार मंदार लहाने आणि पोलीस शिपाई झेपले यांनी घटनास्थळी धाव घेत सर्व जखमींना उपचारा साठी ग्रामीण रुग्णालय महाड येथे दाखल केले.

Exit mobile version