काशीद किनारी दोन कार जळून खाक

मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

| कोर्लई | वार्ताहर |

मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारी शनिवारी पर्यटनासाठी आलेल्या व पार्किंग करून ठेवलेल्या दोन गाड्या अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाल्या. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

ठाणे येथून (दि.23) मार्च रोजी पर्यटनासाठी काशिद समुद्रकिनारी रस्त्यालगत पार्किंग करून ठेवलेल्या मर्सिडीज सीएलसी 350 मॉडेलची कार नं- एमएच 14 सीसी 7681 व तिच्या बाजूला पार्किंग केलेली लाल रंगाची टोयोटो कार नं. एमएच 14 डीटी 5244 असे अचानक लागलेल्या आगीत जळून नुकसान झाले. याबाबत मुरुड पोलीस ठाण्यात अकस्मात अग्नी क्र.1/2024 दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार एल.डी.गोंधळी हे करीत आहेत.

Exit mobile version