| पनवेल | वार्ताहर |
दोन अनोळखी इसमांनी आपापसात संगनमत करून एक इसमाला रिक्षात जबरदस्तीने बसवून त्याला शिवीगाळ व मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच, त्यांच्याकडील 15 हजार रोख रक्कम काढून घेऊन पसार झाले. या दोन्ही आरोपींना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नारायण महतो (28, रा. करंजाडे) याला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दोन अनोळखी इसमांनी आपापसात संगनमत करून रिक्षात जबरदस्तीने बसविले. त्यानंतर त्याला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील 15 हजारांची रोख रक्कम काढून घेऊन पसार झाले होते. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रकाश पवार, पोहवा अमोल पाटील, पोना अशोक राठोड, पोना मिथुन भोसले, लक्ष्मण जगताप, पोशी विशाल दुधे आदींच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासद्वारे आरोपी आकाश चव्हाण (36 रा. भिंगारी), सुरेश देडे (25 रा. करंजाडे) यांना गुन्ह्यातील रिक्षासह ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून रोख रक्कमसुद्धा पनवेल शहर पोलिसांनी हस्तगत केली आहे.
रोकड लंपास करणार्या दोघांना अटक
