। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल तालुक्यातील खारपाडा टोल नाक्याजवळ शिव हॉटेलसमोरील पार्कींगमध्ये उभ्या करून ठेवलेल्या ट्रकमधून अज्ञात चोरट्याने 200 लीटर डिझेलची चोरी केली आहे. यावेळी चालकाने त्यांना हटकले असता त्याला धमकावून त्याच्याकडील मोबाईल व रोख रक्कम जबरीने चोरी करून ते पसार झाले आहेत.
बलवान गौतम (38) याने त्याच्या ताब्यातील ट्रक शिव हॉटेलसमोरील पार्कींगमध्ये उभा करून ठेवला होता. बलवान ट्रकमध्ये झोपला असताना 4 अनोळखी इसमांनी त्याच्या ट्रकमधील 200 लीटर डिझेलची चोरी केली. यावेळी त्याने हटकले असता त्याला चौकडीने धमकावून त्याच्याकडील मोबाईल फोन व 700 रुपये रोख रक्कम काढून घेऊन ते पसार झाले आहेत. याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.