स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

। मुंबई । प्रतिनिधी ।

पावसाळ्यात इमारतींचे स्लॅब कोसळण्याच्या दुर्घटना घडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना मुंबईतील पूर्व उपनगरातून समोर आली आहे. मुंबईच्या विक्रोळीच्या पार्क साईट परिसरात एका नव्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

विक्रोळी पूर्व परिसरात बांधकाम सुरु असलेल्या एका पाच मजली इमारतीत नागेश आर रेड्डी (38) हे सुरक्षारक्षकाचं काम करत होते. रविवारी (दि. 9) रात्री त्यांचा मुलगा रोहित (10) त्यांच्यासाठी जेवणाचा डब्बा घेऊन आला होता. डब्बा दिल्यावर तो आपल्या वडिलांशी बोलत असताना अचानक इमारतीचा स्लॅब कोसळल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

Exit mobile version