अलिबागमध्ये रविवारी दोघांचा मृत्यू

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबागमध्ये रविवारी दोघांचा अकस्मात मृत्यू झाला. यातील एकजण छातीत दुखून, तर दुसरा विजेच्या झटक्याने दगावला.

विद्यानगर येथील प्रस्तावित मूकबधीर विद्यालयाच्या इमारतीचे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. रविवारी सकाळी नरेश चंद्रा राजवंशी (39) मूळ रा. पश्‍चिम बंगाल हा कामगार सेंटरींगचे काम करीत होता. अचानक विजेचा झटका लागल्याने तो बेशुद्ध पडला. त्याला तात्काळ अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासून तो अगोदरच मृत झाल्याचे सांगितले. तसेच जतिन लालचंदानी यांना दुपारी अचानक घाम फुटला. त्यानंतर छातीत दुखू लागले. त्यांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु त्यांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद अलिबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Exit mobile version