। पुणे । प्रतिनिधी |
पुण्यात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला असून या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. ही घटना वारजे माळवाडी येथील गोकुळनगर येथे मंगळवारी मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास घडली.
वारजे माळवाडी परिसरात असणाऱ्या गोकुळ नगर येथे मध्यरात्री 3 वाजता पत्र्याचे बांधकाम असलेल्या घरामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन भीषण आग लागली. हा स्फोट इतका भीषण होता की, सिलेंडरचे सर्व भाग वेगवेगळे झाले होते. तसेच, या स्फोटामुळे पत्र्याच्या शेडमधील सामानाची राखरांगोळी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस तसेच अग्निशमन दल घटनास्थळी हजर झाले. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत 20 ते 22 वर्षांचा तरुण आणि एक प्रौढ व्यक्ती गंभीरित्या होरपळले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मोहन चव्हाण आणि आतिश चव्हाण असे मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेचा वारजे पोलीस अधिक तपास करत आहेत.